एनसीसी छात्रसैनिकांना सरकारकडून शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST2021-04-18T04:20:02+5:302021-04-18T04:20:02+5:30
कर्जत : अहमदनगरच्या १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या सर्वाधिक छात्रसैनिकांना राज्य सरकारकडून प्रोत्साहनपर मुख्यमंत्री स्कॉलरशिप मिळाली आहे, अशी ...

एनसीसी छात्रसैनिकांना सरकारकडून शिष्यवृत्ती
कर्जत : अहमदनगरच्या १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या सर्वाधिक छात्रसैनिकांना राज्य सरकारकडून प्रोत्साहनपर मुख्यमंत्री स्कॉलरशिप मिळाली आहे, अशी माहिती १७ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे यांनी दिल्याची माहिती दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी दिली.
एनसीसीमध्ये विविध शिबिरे, साहसी उपक्रम, सामाजिक उपक्रम, लष्करी व एनसीसी प्रशिक्षणामध्ये व शैक्षणिकदृष्ट्या अव्वल असणाऱ्या निवडक छात्रसैनिकांना दरवर्षी मुख्यमंत्री फंडातून ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी छात्रसैनिकांना मुख्यमंत्री शिष्यवृत्तीचे धनादेश वितरित केले. या छात्रसैनिकांना मेजर संजय चौधरी यांचे मार्गदर्शन मिळाले.
औरंगाबाद ग्रुपमधून व महाराष्ट्र राज्यातून सर्वाधिक १७ छात्रसैनिकांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यात सिनिअर अंडर ऑफिसर किरण गोरे, अंडर ऑफिसर तुषार जगताप, अंडर ऑफिसर गीता नेवसे, अंडर ऑफिसर अंजली शेटे, कॅडेट जाालिंदर बावणे, विशाल बोडखे, प्रवीण फुंदे, शुभम घालमे, गजानन पखाले, महादेव खाडे, प्रतिक्षा बाबर, निकीता देशमुख, कल्याणी वाघमारे, तेजश्री गंगावणे, ज्योती चांदेकर, प्रिती जायभाय, नेहा ससाने यांचा समावेश आहे.
या छात्रसैनिकांचे कर्नल जीवन झेंडे, कर्नल विनय बाली, आमदार रोहित पवार, राजेंद्र फाळके, अंबादास पिसाळ, बप्पासाहेब धांडे, राजेंद्र काका निंबाळकर, प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, गणेश वामण, सतीश गांगर्डे, शंकर मैना, खंडू खुळे, किसन सूळ, सुभेदार मेजर लोकेंदर सिंग, सुभेदार सच्चेंदर सिंग, सुभेदार सयाजी जाधव, सुभेदार एस. के. सखलानी यांनी कौतुक केले आहे.