योजनेत ग्रामीण भागातील बेरोजगारांना सामावून घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:37 IST2021-02-05T06:37:21+5:302021-02-05T06:37:21+5:30
जिल्ह्यातील युवक - युवतींना सर्जनशीलतेला वाव मिळावा म्हणून स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करून त्याद्वारे ग्रामीण तथा शहरी क्षेत्रात सूक्ष्म, ...

योजनेत ग्रामीण भागातील बेरोजगारांना सामावून घ्यावे
जिल्ह्यातील युवक - युवतींना सर्जनशीलतेला वाव मिळावा म्हणून स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करून त्याद्वारे ग्रामीण तथा शहरी क्षेत्रात सूक्ष्म, लघु उपक्रमांद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी तसेच बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, या उद्देशाने अनेक कर्ज योजना जिल्हा उद्योग केंद्राकडे आजही उपलब्ध आहेत. मात्र त्या सर्व नावालाच आहेत. बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मितीत हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेनुसार बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे. या उद्देशाने कर्ज उपलब्ध करून देण्याच्या या योजना जिल्हा उद्योग केंद्राकडे आहेत.
मात्र बेरोजगार युवक व महिलांना योग्य ती माहिती आणि त्या संदर्भात अचूक समुपदेशन होत नसल्याने या योजना केवळ कागदावर राहिल्या आहेत. या योजनेचा जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकारी आणि कार्यालयातील इतर कर्मचारी यांच्याकडून याबाबत ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारचे जनजागरण होत नसल्याने ग्रामीण भागातला बेरोजगार बिचारा आजही उपाशी आहे.
जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकार्यांनी संपूर्ण जिल्हाभर प्रत्येक तालुक्यात या योजना समजाऊन सांगण्यासाठी मेळावे आयोजित करावेत, अशी मागणी ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनयझेशनचे जिल्हा अध्यक्ष हाजी फय्याज बागवान, जिल्हा संघटक शफीक बागवान, राहुरी तालुकाध्यक्ष अतीक बागवान, बेलापुर शहराध्यक्ष अनिस तांबोळी, शफीक आतार, गुलाम गौस कुरेशी, गफुर बेपारी, इस्माईल कुरेशी, इमदाद खाटीक, फरीद तांबोळी, मुस्लीम खाटिक समाज सेवा संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी इब्राहीम कुरेशी, नजीरभाई मुलाणी, अबुभाई कुरेशी, माजी नगरसेवक हाजी रज्जाकभाई बागवान, हाजी रफीक बागवान, अकबरभाई बागवान, रफीक बागवान, जाकीरहुसेन बागवान, मुजीम चौधरी यांनी केली आहे.