नागापूरमधील एसबीआयचे एटीएम मशीन रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 13:20 IST2018-08-01T13:20:06+5:302018-08-01T13:20:46+5:30
नगर-मनमाड महामार्गावरील नागापूर चौकात असणारे एसबीआय बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएम मशीन मजबूत असल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला. मशीन फोडण्याची दुसरी घटना आहे.

नागापूरमधील एसबीआयचे एटीएम मशीन रस्त्यावर
निंबळक : नगर-मनमाड महामार्गावरील नागापूर चौकात असणारे एसबीआय बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएम मशीन मजबूत असल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला. मशीन फोडण्याची दुसरी घटना आहे.
नगर- मनमाड महामार्गालगत हे एटीएम मशीन आहे. या मार्गावरून वाहनाची रात्रभर वर्दळ सुरू असते. तरीही चोरट्यांनी धाडस करत रात्री एक वाजण्याच्या सुमारास एटीएम मशीन फोडण्याचा प्रत्यन करण्यात आला. मशीन बाहेर आणण्यात आली. मशीनचे वजन जास्त असल्यामुळे चोरट्यांना उचलता आली नाही. एटीएममध्ये असणारा सीसीटीव्ही कॅमेराही फोडला आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचले. हे मशीन फोडण्याची घटना दुसरी आहे.