सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणातून समाजपरिवर्तनाचा पाया घातला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST2021-01-04T04:18:20+5:302021-01-04T04:18:20+5:30

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त (दि. ३) येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयात संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ...

Savitribai Phule laid the foundation of social change through education | सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणातून समाजपरिवर्तनाचा पाया घातला

सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणातून समाजपरिवर्तनाचा पाया घातला

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त (दि. ३) येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयात संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, आर.एम.कातोरे, अजय फटांगरे, नगरसेवक किशोर टोकसे, सुभाष सांगळे, विलास कवडे, बाळासाहेब गायकवाड, विक्रम ओहोळ उपस्थित होते.

मंत्री थोरात म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्याबरोबरच बालविवाह विरोध, बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना, दीन-दलितांना, अनाथांना प्रेम व न्याय मिळवून देण्यासाठी भरीव कार्य केले. स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी काम केले. आज स्त्री पुरुषाच्या बरोबरीने शिक्षण, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात काम करीत आहे. हे केवळ सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे घडले, असे ते म्हणाले.

------------

फोटो नेम : ०३ अभिवादन कार्यक्रम संगमनेर

ओळ : संगमनेर येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

Web Title: Savitribai Phule laid the foundation of social change through education