श्रीगोंदा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST2021-01-04T04:18:28+5:302021-01-04T04:18:28+5:30

श्रीगोंदा : येथे समता परिषद व सावित्रीबाई फुले ब्रिगेडच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ...

Savitribai Phule Jayanti celebration at Shrigonda | श्रीगोंदा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

श्रीगोंदा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

श्रीगोंदा : येथे समता परिषद व सावित्रीबाई फुले ब्रिगेडच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

राज्य साखर संघाचे संचालक घनश्याम शेलार, हरियाणा राज्यातील गृहरचना विभागाचे संचालक मकरंद खेतमाळीस, राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षक भाग्यश्री खेतमाळीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. घुगल वडगाव, घारगाव येथील वसतिगृहातील मुलांसाठी ब्लँकेट वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे, सेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष संजय डाके, बापू गोरे, अशोक खेंडके, एम. डी. शिंदे, दीपक शिंदे, संतोष क्षीरसागर, संतोष खेतमाळीस, शहाजी खेतमाळीस, सतीश मखरे, प्रशांत गोरे, संतोष कोथिंबीरे, संग्राम घोडके, गोरख आळेकर, आशा साबळे, संध्या रसाळ, प्रतिभा गांधी आदी उपस्थित होते.

Web Title: Savitribai Phule Jayanti celebration at Shrigonda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.