शांतिनिकेतन कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:19 IST2021-01-04T04:19:26+5:302021-01-04T04:19:26+5:30

पारनेर : धोत्रे बुद्रुक (ता. पारनेर) येथील शांतिनिकेतन काॅलेज ऑफ फार्मसीमध्ये रविवारी आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी ...

Savitribai Phule Jayanti celebration at Santiniketan College | शांतिनिकेतन कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

शांतिनिकेतन कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पारनेर : धोत्रे बुद्रुक (ता. पारनेर) येथील शांतिनिकेतन काॅलेज ऑफ फार्मसीमध्ये रविवारी आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

महाविद्यालयाच्या सचिव सोनाली शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे, प्रा. प्रवीण कर्डक, प्रा. प्रियंका साबळे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. कांचन जाधव यांनी केले. प्रा. प्रसाद काळे यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचा यू-ट्यूबवरील ‘सावित्रीबाईंची प्रेरणा, मुलींच्या शिक्षणाची गंभीर समस्या व आपली जबाबदारी’ हा व्हिडिओ सर्व शिक्षक, शिक्षकेतर सदस्य, विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.

फोटो : ०३ शांतिनिकेतन

धोत्रे बुद्रुक येथील शांतिनिकेतन येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Web Title: Savitribai Phule Jayanti celebration at Santiniketan College