शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

अहमदनगरमधील सावेडी कचरा डेपोला आग, शेकडो टन कचरा खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 22:09 IST

सावेडी उपनगरात धुराचे साम्राज्य, शेतकऱ्यांचे नुकसान

अहमदनगर : महापालिकेच्या सावेडी कचरा डेपोला सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली. याबाबत माहिती मिळताच पालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. डेपोला आग लागल्याने सावेडी उपनगर परिसरात सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले.  

महापालिकेचा शेंडी- पोखर्डी रस्त्यावर कचरा डेपो आहे. शहरासह उपनगरांतील कचरा संकलन करून तो डेपो साठविला जातो. या साठविलेल्या कचऱ्यापासून खत बनविले जाते. या ठिकाणी साठविलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली. काही वेळात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आगीने वेढले. सोसाट्याचा वारा असल्याने आग भडकली होती. आगीची भीषणता लक्षात घेऊन परिसरातील शेतकऱ्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. महापालिकेचे दोन अग्निशमन बंब साडेसात वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. परंतु, त्यापैकी एक बंब नादुरूस्त होता, असे तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एका बंबाच्या सहाय्याने आग विझविण्याचे काम हाती घेण्यात आले. पण, आग आटोक्यात आली नाही. कचऱ्यात प्लास्टिकचाही समावेश असल्याने आग आणखी भडकली.

या आगीने उग्र रुप धारण केल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा हिरवा चारा, फळबागा होरपळल्या आहेत. कचरा डेपोला लागलेल्या आगीचा धुर सावेडी उपनगरांतील ढवणवस्ती, निर्मलनगर, लक्ष्मीनगर, आदी भागात पसरला होता. तपोवन रस्ता परिसरातही धुरासह दुर्गंधी पसरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. बुऱ्हाणनगर हद्दीत नव्याने वसाहती उभ्या राहिलेल्या आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य होते. रात्री उशिरापर्यंत आग अटोक्यात न आल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. गतवर्षी मे महिन्यात कचरा डेपोला आग लागली होती. डेपोला दुसऱ्यांदा सोमवारी आग लागली. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही महापौर वाकळे यांनी दिली भेटकचरा डेपोला आग लागल्याची माहिती मिळताच महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह नगरसेवक संपत बारस्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आग आटोक्यात आणण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे वाकळेंनी सांगितले.

आगीची माहिती देऊनही अधिकारी व कर्मचारी आले नाहीत़ साडेसात वाजता दोन अग्निशमन बंब आले़ त्यापैकी एक बंद होता़ त्यामुळे आग विझविण्यास उशिर झाला.करण शेवाळे, शेतकरी

टॅग्स :fireआगAhmednagarअहमदनगर