शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद येथील साई भक्तांचा अपघात : महिलेचा मृत्यू, सात जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 15:37 IST

शिडीर्तील साईबांबाच्या दर्शनासाठी निघालेल्या साईभक्तांच्या इनोव्हाला जामखेड - नगर रोडवर अपघात झाला. या अपघातामध्ये आठ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

जामखेड :  हैदराबाद येथील साई भक्त शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना जामखेड- नगर रस्त्यावरील पोखरी ( ता. आष्टी जि. बीड) येथील वळणाच्या रस्त्यावर इनोव्हा वाहन पलटी होऊन एका महिलेचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.  उपचार चालू असताना निलावेणी श्रीरामडू नानचरला (वय २५) हिचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी असलेल्या रमना रेड्डी यास अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

हैदराबाद येथील साई भक्त शिर्डी येथे साई दर्शनासाठी इनोव्हा वाहनाने मंगळवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान नगर - जामखेड रस्त्याने जात असताना पोखरी (ता. आष्टी) येथील अवघड वळणावर इनोव्हा वाहन चालक हरीशंकर ( रा. हैदराबाद, आंध्रप्रदेश) यास वाहनाच्या वेगामुळे अंदाज न आल्याने वाहन पाच फूट खोल खड्ड्यात पडून दोन ते पलटी मारल्याने वाहनातील प्रवाशांना जोरदार मार लागून वाहनातील सर्वजण गंभीर जखमी झाले. पोखरी येथील एका व्यक्तीने सदर अपघात घटनेची माहिती जामखेड येथील माजी सरंपच सुनिल कोठारी यांना दिली. त्यांनी तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळी गेले. अरूणा रमना रेड्डी (वय २८),हनुमंत सत्या आण्णा आरो (वय २५), निलावेणी श्रीरामडू नानचरला (वय २५), रमना रंगादास रेड्डी (वय ३६), साईचरण (वय ५१), प्रणिती रेड्डी (वय १२), श्रीजा (वय-१२), हरीशंकर (वय २५) या सर्वांना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी युवराज खराडे, डॉ. गिते, डॉ. लाड यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना जामखेड येथील तीन वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

रस्त्याचे काम प्रलंबित जामखेड - नगर रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश होऊन वर्ष झाले आहे. परंतु अद्याप या रस्त्याचे काम सुरू झाले नाही. पावसामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम खाते या रस्त्याला निधी नसल्याचे सांगितले जात.े त्यामुळे ते रस्त्याची देखभाल करित नाही. रस्त्यावर खड्डे पडले तर तात्पुरते मुरूम टाकून खड्डे बुजवले जाते. त्यामुळे जामखेड - नगर रस्ता अपघाती रस्ता ठरला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड