शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

‘त्या’ शेतकऱ्याच्या खात्यावर १,४०० ऐवजी जमा झाले ३० हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 07:36 IST

केलवड येथील सावळाराम गमे यांच्या २ हेक्टर ६१ गुंठे या क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचे अतिवृष्टीने नुकसान झाले होते.

- नितीन गमे   राहाता (जि. अहमदनगर) : शेतकऱ्याच्या पिकाचे शंभर टक्के नुकसान होऊनही विमा कंपनीने प्रतिगुंठा ५ रुपयांप्रमाणे १४०६ रुपयांची रक्कम जमा केली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल विमा कंपनीने घेतली त्या शेतकऱ्याच्या खात्यावर आता ३० हजार रुपये जमा झाले आहेत. ‘लोकमत’मुळे न्याय मिळाल्याची भावना शेतकरी सावळाराम गमे यांनी व्यक्त केली आहे. 

केलवड येथील सावळाराम गमे यांच्या २ हेक्टर ६१ गुंठे या क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचे अतिवृष्टीने नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी गमे यांना अवघे १४०० रुपये मिळाले होते. त्यानंतर ‘८० रु. विमा, ५ रुपये जमा, काय थट्टा लावली राव ! अशी बातमी २ नोव्हेंबर २०२२ च्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली होती. ही बातमी प्रसिद्ध होताच कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पुणे कृषी आयुक्तालय, नगर कृषी अधीक्षक कार्यालय यांनीच थेट दखल घेऊन शेतकऱ्याला न्याय देण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून इन्शुरन्स कंपनीला पत्र दिले होते. यात ‘लोकमत’च्या वृत्ताचा संदर्भ देऊन शेतकऱ्याची थट्टा केल्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता. गमे यांच्या खात्यात विमा कंपनीने फक्त ५ रु. प्रति गुंठ्याप्रमाणे १४०० रु. जमा केले होते. आता गमे यांच्या खात्यावर ३० हजार रुपये जमा झाले आहेत.

बातमीनंतर दिले ४.३६ काेटी 

राहाता तालुक्यातील १५ हजार ४१० शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. यामध्ये ८ हजार ५०० शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे कंपनीस तक्रारी करण्यात आल्या होत्या. यात ७ हजार ८५ शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यात २ कोटी ३६ लाख जमा झाले होते; परंतु ‘लोकमत’ने गमे यांच्याबाबतची बातमी प्रसिद्ध करताच कंपनीने इतर शेतकऱ्यांच्याबाबतही संवेदनशीलता दाखवली. त्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या खात्यातही ४ कोटी ३० लाखांचा दुसरा हप्ता वर्ग झाला. आतापर्यंत तालुक्यातील ६ कोटी ६६ लाख रुपये विमा कंपनीकडून जमा करण्यात आले आहेत.

ज्यांना शून्य रक्कम, त्यांनाही होणार लाभ 

कंपनीस तक्रार करणाऱ्या सरासरी १३०० ते १५०० शेतकऱ्यांना अजून काहीही रक्कम जमा झालेली नाही. अशा शेतकऱ्यांना १५ जानेवारीच्या आत रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. 

टॅग्स :Farmerशेतकरी