सौंदाळ्याला मिळाला पूर्ण वेळ ग्रामसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST2021-07-29T04:21:57+5:302021-07-29T04:21:57+5:30
भेंडा : सौंदाळा (ता.नेवासा) या गावाला पूर्ण वेळ ग्रामसेवकाची नेमणूक गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी केली असल्याची माहिती ...

सौंदाळ्याला मिळाला पूर्ण वेळ ग्रामसेवक
भेंडा : सौंदाळा (ता.नेवासा) या गावाला पूर्ण वेळ ग्रामसेवकाची नेमणूक गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी केली असल्याची माहिती प्रहारचे शाखाध्यक्ष गोरक्षनाथ आरगडे यांनी दिली.
सौंदाळा गावाला तीन वर्षांपासून पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने कामकाजात अडचणी येत होत्या. यामुळे प्रहारचे शाखाध्यक्ष गोरक्षनाथ आरगडे यांनी गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळावा, यासाठी १९ जुलै रोजी नेवाशाचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले होते. सौंदाळ्याला ग्रामसेवकाची नेमणूक झाली नाही, तर २८ जुलै रोजी प्रहारच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येणार होते. या निवेदनाची दखल घेत, गटविकास अधिकारी यांनी त्वरित सौंदाळा गावाला ग्रामसेवकाची नेमणूक केल्यामुळे प्रहारचे आंदोलन स्थगित झाल्याची माहिती पोटे यांनी दिली.
या मागणीसाठी प्रहार किसान आर्मीचे प्रमुख रघुनाथ आरगडे, जिल्हा सल्लागार पांडुरंग औताडे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर सांगळे, बाळासाहेब खर्जुले, अनिल विधाटे, निवृत्ती जावळे, बाळासाहेब टिळेकर, बबन आरगडे, नागनाथ आगळे, नवनाथ कडू, जालिंदर आरगडे, अरविंद आरगडे, बंडू आरगडे, संदीप पाखरे, राजेंद्र चामुटे, बाळासाहेब ठुबे, आप्पा आरगडे, रामदास आरगडे, बाळासाहेब आरगडे, संकेत बोधक, विजय धाकतोडे यांनी केला.