बिबट्याने ओढून नेल्याचा स्वत:च रचला बनाव, पोलिसांचा पर्दाफाश, सतीश गायकवाडला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 21:47 IST2020-06-16T21:47:47+5:302020-06-16T21:47:56+5:30

पारनेर : बिबट्याने ओढून नेल्याचा स्वत:च बनाव करून कोहोकडी येथील सतिश गायकवाड हा मित्रांसोबत पळून गेल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी मंगळवारी दुपारी त्याला अटक केली. 

Satish Gaikwad arrested for fabricating leopard | बिबट्याने ओढून नेल्याचा स्वत:च रचला बनाव, पोलिसांचा पर्दाफाश, सतीश गायकवाडला अटक

बिबट्याने ओढून नेल्याचा स्वत:च रचला बनाव, पोलिसांचा पर्दाफाश, सतीश गायकवाडला अटक

पारनेर : बिबट्याने ओढून नेल्याचा स्वत:च बनाव करून कोहोकडी येथील सतिश गायकवाड हा मित्रांसोबत पळून गेल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी मंगळवारी दुपारी त्याला अटक केली. 

पारनेर तालुक्यातील कोहोकडी येथील सतिश सुखदेव गायकवाड यास बिबट्याने रविवारी ओढून नेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवली परंतु तपास लागला नाही. मंगळवारी सकाळी सतिशचे कोणीतरी अपहरण केल्याची फिर्याद पारनेर पोलिस ठाण्यात दिली.

त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी, भालचंद्र दिवटे, रवींद्र पाचारणे यांनी सतिशबरोबर असणाºया मित्राचे लोकेशन घेऊन तपास सुरू केला. दुपारी सतिश गायकवाड स्वत:हुन पुणे जिल्ह्यातील आळेफाटा पोलिस ठाण्यात हजर झाला. नंतर पारनेर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. स्वत:च मित्राच्या मदतीने पळून गेल्याचा बनाव केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
---
फोटो 
स्वत: पळून जाऊन अपहरणाचा बनाव रचणाºया पारनेर तालुक्यातील कोहोकडी येथील सतिश गायकवाड यास पोलिसांनी ताब्यात घेतले. समवेत सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पोलिस भालचंद्र दिवटे, व पोलीस दिसत आहे

Web Title: Satish Gaikwad arrested for fabricating leopard