रस्त्याच्या कामाबाबत सरपंचाची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:26 IST2021-04-30T04:26:29+5:302021-04-30T04:26:29+5:30
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील आडगाव ते बेलाचे झाड या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम सध्या सुरू केले आहे. हे ...

रस्त्याच्या कामाबाबत सरपंचाची तक्रार
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील आडगाव ते बेलाचे झाड या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम सध्या सुरू केले आहे. हे काम निकृष्ट पद्धतीने होत आहे, अशी लेखी तक्रार आडगावचे सरपंच जगन्नाथ लोंढे, उपसरपंच सखूबाई गर्दे यांनी पाथर्डी पंचायत समितीकडे केली आहे. आडगाव ते बेलाचे झाड या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पंचवीस पंधरा अंतर्गत सुमारे तीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर या रस्त्यावर खडीकरण करून भराव टाकण्यात आला. परंतु, भरावाची उंची कमी ठेवल्यामुळे पाटचारीतून येणारे पाणी सरळ रस्त्यावर येत आहे. या ठिकाणी सिमेंटचे पाईप वापरा अथवा भरावाची उंची वाढवा, अशी मागणी शाखा अभियंत्याकडे केली असता त्यांनी आम्हाला अरेरावीची व उडवाउडवीची उत्तरे दिली, असे निवेदनात म्हटले आहे.