ध्रुव ग्लोबल स्कूलचा सारंग भालके ‘सारेगमप’मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:35+5:302021-06-24T04:15:35+5:30
त्यातील चौदा जणांची स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यात संगमनेरातील ध्रुव ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी सारंग भालके याची निवड झाली आहे. ...

ध्रुव ग्लोबल स्कूलचा सारंग भालके ‘सारेगमप’मध्ये
त्यातील चौदा जणांची स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यात संगमनेरातील ध्रुव ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी सारंग भालके याची निवड झाली आहे. सारंगचे वडील संगीत शिक्षक आहेत. ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा कल विचारात घेऊन त्यानुसार त्या विषयात त्यांना पारंगत करण्याचा प्रयत्न केला जातो.
सारंग भालके या इयत्ता सहावीतील विद्यार्थ्याचे आई - वडील शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. सोपान भालके ध्रुव ग्लोबलमध्ये संगीताचे शिक्षण देतात.
त्यामुळे सारंगचा लहानपणापासूनचा कल गायकीत आहे. ध्रुव ग्लोबलमध्ये प्रवेश घेतल्यापासूनच शालेय व्यवस्थापनाने शिक्षणासह त्याच्या आवडीनुसार त्याला संगीताचे शिक्षण दिले. घरातूनही त्याला याविषयी सतत मार्गदर्शन मिळाले. या स्पर्धेच्या पात्रता फेर्यांमध्ये त्याने आपल्या गायकीतून परीक्षकांनाही मोहात पाडले आणि राज्यभरातून निवडण्यात आलेल्या
चौदा जणांमध्ये त्याने स्थान पटकावले. सारंग भालके याने आपल्या गायकीच्या बळावर सारेगमपसारख्या मोठ्या मंचावर प्रवेश मिळविल्याने स्कूलचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, उपाध्यक्ष गिरीश मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी त्याचे कौतुक केले.
फोटो नेम : २३०६२०२१ सारंग भालके, संगमनेर