सराईत गुन्हेगारासह सराफ जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:36 IST2021-03-04T04:36:48+5:302021-03-04T04:36:48+5:30

भगवान ईश्वर भोसले (वय २१ रा. बेलगाव ता. कर्जत) व रामा अभिमन्यू इंगळे (वय ३३ रा. पाडळी ता. शिरुर ...

Saraf jailed with Sarait criminals | सराईत गुन्हेगारासह सराफ जेरबंद

सराईत गुन्हेगारासह सराफ जेरबंद

भगवान ईश्वर भोसले (वय २१ रा. बेलगाव ता. कर्जत) व रामा अभिमन्यू इंगळे (वय ३३ रा. पाडळी ता. शिरुर जि. बीड) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. भगवान भोसले व त्याच्या चार भावांनी मागील दोन महिन्यात नगर तालुक्यात विविध ठिकाणी घरफोड्या व जबरीचोरी करून धुमाकूळ घातला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना एलसीबी पथकाने कडा ते शिरुर कासार (जि. बीड) रस्त्यावर सापळा लावून भगवान भोसले याला ताब्यात घेतले. यावेळी त्याचा भाऊ संदीप भोसले हा पसार झाला. पथकाने भोसले याची चौकशी केली तेव्हा चोरीचे सोने त्याने शिरुर कासार येथील गणेश ज्वेलर्स या दुकानात विकल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने ज्वेलर्सचा मालक रामा इंगळे यालाही अटक केली. पोलिसांनी दोघा आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. भगवान भोसले व त्याच्या साथीदारांनी पाच घरफोड्या व एक जबरीचोरी केल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. या आरोपींच्या विरोधात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Saraf jailed with Sarait criminals