विहीरीत पडलेला सापास सर्पमित्राकडून जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 18:31 IST2019-05-08T18:31:46+5:302019-05-08T18:31:49+5:30
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील राजेंद्र शामराव जाधव यांच्या विहिरीत पडलेल्या सापाला पकडून सर्पमित्र भरत रामनाथ दिघे यांनी जीवदान दिले.

विहीरीत पडलेला सापास सर्पमित्राकडून जीवदान
चांदेकसारे : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील राजेंद्र शामराव जाधव यांच्या विहिरीत पडलेल्या सापाला पकडून सर्पमित्र भरत रामनाथ दिघे यांनी जीवदान दिले.
काल बुधवारी सकाळी जाधव यांच्या विहिरीत साप पडला असल्याचे सोनू सरोदे व भाऊसाहेब सरोदे यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ तळेगाव दिघे येथील सर्पमित्र भरत दिघे यांना संपर्क केला. एक तासाचा दिघेही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीने चाळीस फूट विहिरीत पडलेल्या सापाला बाहेर काढले. प्रशिक्षण व अनुभव नसणा-या व्यक्तींनी सापाला पकडू नये असा सल्लाही त्यांनी उपस्थित नागरिकांना दिला. पकडलेला साप स्वत: त्यांच्या बाईकवर घेऊन जंगलात किंवा शेतात सोडून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.