नगर जिल्ह्यात संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:30+5:302021-09-02T04:46:30+5:30
अहमदनगर : जिल्ह्याच्या दक्षिण भागात सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेला पावसाचा जोर मंगळवारी दुपारपर्यंत कायम होता. पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील ...

नगर जिल्ह्यात संततधार
अहमदनगर : जिल्ह्याच्या दक्षिण भागात सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेला पावसाचा जोर मंगळवारी दुपारपर्यंत कायम होता. पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा वेढा पडला. अनेक जनावरे, वाहने पाण्यात वाहून गेली. या दोन्ही तालुक्यांतील नद्या, नाल्यांना पूर आला. नगर तालुक्यात झालेल्या पावसाने सीना नदीला पूर आला असून, नगर-कल्याण महामार्ग आणि नगर-औरंगाबाद महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
सोमवारी रात्री आठ वाजता सुरू झालेला पाऊस मंगळवारी दुपारी दोनपर्यंत सुरूच होता. सलग १८ तास संततधार असल्याने नगरच्या दक्षिण भागातील नद्या, नाल्यांना पूर आला. रस्ते पाण्याखाली गेले.
शेवगाव तालुक्यातील आखेगाव परिसरात जनावरे, वाहने वाहून गेली आहेत. नानी नदीच्या पलीकडे १०० नागरिक अडकले होते. त्यांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले. जोरदार पावसामुळे शेळ्या, मेंढ्या मृत पावल्या आहेत.
नगर तालुक्यात झालेल्या पावसाने सीना नदीला पूर आला.
जिल्ह्यात सोमवारी एकूण सरासरी ४४ मि.मी. इतका पाऊस झाला. पाथर्डी तालुक्यात एकूण १९८ मि.मी., शेवगाव तालुक्यात ८५ मि.मी. तर नगर तालुक्यात ७४ मि.मी. पाऊस झाला. संततधार पावसाने दोन्ही तालुक्यांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
फोटो -सीडीमेल
शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील नानी नदीला आलेल्या पुराने धोक्याची पातळी ओलांडून पुराचे पाणी गावात शिरले.