संजीवनीची ‘सोलर कार’ देशात दुसरी
By Admin | Updated: April 27, 2017 18:53 IST2017-04-27T18:53:37+5:302017-04-27T18:53:37+5:30
‘नॅशनल सोलर व्हेकल चॅलेंज २०१७’ या राष्ट्रीय स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘सोलर कार’ला देशात द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
संजीवनीची ‘सोलर कार’ देशात दुसरी
आ नलाईन लोकमतकोपरगाव : ‘नॅशनल सोलर व्हेकल चॅलेंज २०१७’ या राष्ट्रीय स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘सोलर कार’ला देशात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. दिल्लीच्या डायनॅमिस्ट मोटर स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेडने मेहसाना(गुजरात) येथील गणपत विद्यापीठात झालेल्या स्पर्धेत संजीवनीच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ‘सोलर कार’ ला द्वितीय क्रमांक मिळाला. प्राचार्य डॉ.डी.एन.क्यातनवार, विभाग प्रमुख डॉ. ए.जी.ठाकुर व डॉ.बी.एस.आगरकर व प्रा.व्ही.पी.भऊरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मयुरेश वाघ (टीम लिडर) च्या नेतृत्वाखाली मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या एकुण २५ विद्यार्थ्यांच्या चमुने कार डीझाईन, असेंब्ली व फॅब्रिकेशन अशी सर्व कामे विभागुन संपुर्ण कार तयार केली. या स्पर्धेत २७ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. वा