संजीवनीच्या पाॅलिटेक्निक कॉलेजच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:13+5:302021-06-26T04:16:13+5:30
कोपरगाव : संजीवनी के.बी.पी. पाॅलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आयोजित केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हअंतर्गत सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन या ...

संजीवनीच्या पाॅलिटेक्निक कॉलेजच्या
कोपरगाव : संजीवनी के.बी.पी. पाॅलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आयोजित केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हअंतर्गत सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन या वाहन उद्योगातील सुट्या भागांच्या उत्पादनामध्ये अग्रगण्य असणाऱ्या कंपनीने कॉलेजच्या तब्बल १३० विद्यार्थ्यांची नोकऱ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने मुलाखत घेऊन निवड केली, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्चे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली.
संजीवनी पाॅलिटेक्निक हे उद्योगाभिमुख अभियंते तयार करीत असल्याच्या उपलब्धीवर शिक्कामोर्तब झाले. संजीवनीच्या विद्यार्थ्यांची एकापाठोपाठ एक कंपन्यांमध्ये निवड होत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळविण्यासाठी आवश्यक ते पैलू रुजविले जात आहेत. त्यामुळे संजीवनी पाॅलिटेक्निक ही सर्वांत जास्त नोकऱ्या मिळवून देणारी संस्था ठरली आहे. दिवसेंदिवस उद्योगजगत नवोदित अभियंत्याकडून आधुनिक तंत्रज्ञान अवगत असावे, अशी अपेक्षा करीत आहे. त्यानुसार संजीवनीमध्ये प्रशिक्षण दिले जाते. नोकरीसाठी निवड झालेल्यांमध्ये मेकॅनिकल विभागातील ७२, इलेक्ट्रिकलचे २५ व इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधील ३३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्चे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. प्राचार्य ए. आर. मिरीकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद यांचेही अभिनंदन केले. अंतिम वर्षातील निकाल येताच विद्यार्थी सेवेत रुजू होणार आहेत.
----------