मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संजीव भोर यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 14:31 IST2018-11-25T14:24:02+5:302018-11-25T14:31:56+5:30
मराठा आरक्षण व इतर मागण्यांसदर्भात सोमवारी (दि़.२६) मुंबईत विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांतीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांना अटक केली आहे.

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संजीव भोर यांना अटक
अहमदनगर : मराठा आरक्षण व इतर मागण्यांसदर्भात सोमवारी (दि़.२६) मुंबईत विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांतीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांना अटक केली आहे.
तोफखाना पोलीसांनी भोर यांना त्यांच्या घरून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली. भोर यांना रविवारी दुपारी बारा वाजता जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. मराठा आरक्षण व इतर वीस मागण्यांबाबत विधानभवनावर २६ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्याचा समन्वय समितीने निर्णय घेतला आहे.
या मोर्चाबाबत समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने भोर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाभरात संवाद यात्रा काढली होती. या यात्रेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ सोमवारी निघणा-या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भोर यांना शनिवारीच अटक केली आहे.