राष्ट्रवादीकडून संजय राऊत यांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 18:35 IST2017-08-24T18:35:05+5:302017-08-24T18:35:16+5:30
जैन मुनींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे शिवसेनेचे खा. संजय राऊत यांचा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला

राष्ट्रवादीकडून संजय राऊत यांचा निषेध
अहमदनगर : जैन मुनींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे शिवसेनेचे खा. संजय राऊत यांचा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भिंगारवाला चौक येथील जैन मंदिरासमोर राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते समवेत सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे, पोपट बारस्कर, विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष जॉय लोखंडे, सारंग पंधाडे, बाबासाहेब गाडळकर, निलेश बांगरे, अॅड.वैभव मुनोत, गौतम भांबळ, स्वप्निल ढवण, दिपक खेडकर, किरण पंधाडे, मोना विधाते, समीर भिंगारदिवे, पप्पू पाटील, योगेश राऊत, संजय दिवटे, मतीन ठाकरे, अंकुश मोहिते, सतीश शिरसाठ, शुभम लोट, योगेश होगले, योगेश करांडे उपस्थित होते.