हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात सॅनिटायझर, मास्क वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:21 IST2021-01-25T04:21:32+5:302021-01-25T04:21:32+5:30

ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील नीळकंठेश्वर महिला स्वयंसाहाय्यता बचत गटाच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमात वाण म्हणून महिलांना ...

Sanitizer, mask distribution in turmeric-kumquat program | हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात सॅनिटायझर, मास्क वाटप

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात सॅनिटायझर, मास्क वाटप

ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील नीळकंठेश्वर महिला स्वयंसाहाय्यता बचत गटाच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमात वाण म्हणून महिलांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले.

अध्यक्षा नंदा शिंदे यांनी मकरसंक्रातीनिमित्त तीळगूळ घ्या गोड बोला कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जि. प. सदस्या कोमल वाखारे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी पं. स. सदस्या कल्याणी लोखंडे, बेबीताई मगर, चित्रा वेताळ, सीता ढवळे, प्रतीक्षा चव्हाण, नंदा शिंदे, सविता शिंदे, द्रौपदा राऊत, सुप्रिया गणवीर, पुष्पा ढवळे, अनुराधा हराळ आदी उपस्थित होते. सुवर्णा कुल्लाळ यांनी आभार मानले.

या बचत गटाने ग्रामस्थांसाठी नि:स्वार्थ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून देवी ऑप्टिकल्स ठाणे यांच्यातर्फे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरादरम्यान हेमंत झा, दीपाली जैन, शशिकांत जयस्वाल, रवी भारद्वाज यांनी विशेष सहकार्य केले.

फोटो : २४ ढवळगाव

ढवळगाव येथील हळदी-कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांना सॅनिटायझर, मास्कचे वितरण करण्यात आले.

Web Title: Sanitizer, mask distribution in turmeric-kumquat program