संगमनेरच्या गटविकास अधिकाऱ्यांचे फेसबुक खाते ‘क्लोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST2020-12-27T04:16:05+5:302020-12-27T04:16:05+5:30

गटविकास अधिकारी शिंदे यांचे फेसबुकवर पूर्वीपासूनच खाते आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून कुणीतरी भामट्याने या खात्यातील फोटो काॅपी केले. हे ...

Sangamner's group development officer's Facebook account 'cloned' | संगमनेरच्या गटविकास अधिकाऱ्यांचे फेसबुक खाते ‘क्लोन’

संगमनेरच्या गटविकास अधिकाऱ्यांचे फेसबुक खाते ‘क्लोन’

गटविकास अधिकारी शिंदे यांचे फेसबुकवर पूर्वीपासूनच खाते आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून कुणीतरी भामट्याने या खात्यातील फोटो काॅपी केले. हे फोटो व सुरेश शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करत या भामट्याने सुरेश शिंदे या नावाने फेसबुकचे दुसरे खोटे खाते सुरू केले. गटविकास अधिकारी शिंदे यांच्या पूर्वीच्या अधिकृत खात्याला जोडले गेलेले त्यांचे मित्रमंडळी, ओळखीच्या व्यक्ती व नातेवाईक यांना या भामट्याने खोट्या खात्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. सुरेश शिंदे यांचे हे अधिकृत खाते असल्याचे त्याने भासविले. अडचणीत असल्याचे कारण देत त्याने अनेकांना संदेश पाठवत त्यांच्याकडे पैशाची मागणी केली.

याबाबत काहींना संशय आल्याने त्यांनी गटविकास अधिकारी शिंदे यांच्याशी प्रत्यक्ष तर काहींनी मोबाईलद्वारे संपर्क केला. माझे फेसबुकचे एकच खाते असून दुसरे कुठलेही खाते नसल्याने शिंदे यांनी त्यांना सांगितले. ‘माझे सुरेश शिंदे या नावाने सेम प्रोफाइलचा वापर करून खोटे फेसबुक खाते उघडण्यात आले असून खोट्या खात्याद्वारे अनेकांकडे पैशाची मागणी केली जाते आहे. कृपया कोणीही या मेसेजला उत्तर देवू नये’, अशी पोस्टही शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत खात्याद्वारे केली आहे.

------------------

कोट

गेल्या काही महिन्यांपासून फेसबुक आणि ट्विटरवरचे अनेकांचे खाते क्लोन करण्यात येत आहेत. खऱ्या खात्यातील फोटो आणि माहिती वापरून हे उद्योग केले जातात. आपले खाते कोणी क्लोन करू नये यासाठी फेसबुकवर तशी सेटिंग करावी. तसेच आपली खासगी माहिती आणि फोटो सोशल मीडियावर टाकू नयेत.

-ओंकार गंधे, सायबर सुरक्षा विश्लेषक, नाशिक

Web Title: Sangamner's group development officer's Facebook account 'cloned'