संगमनेरच्या विकासाची घोडदौड सुरूच राहणार
By Admin | Updated: October 12, 2016 01:04 IST2016-10-12T00:31:41+5:302016-10-12T01:04:02+5:30
संगमनेर : संगमनेर नगरपालिकेने शहरात विविध सुविधा देण्याचे काम केले आहे. शहर व तालुक्यातील विकासकामांची घोडदौड सातत्याने सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेरच्या विकासाची घोडदौड सुरूच राहणार
संगमनेर : संगमनेर नगरपालिकेने शहरात विविध सुविधा देण्याचे काम केले आहे. शहर व तालुक्यातील विकासकामांची घोडदौड सातत्याने सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर नगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात विकासकामांचा शुभारंभ आ. थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी देवाचा मळा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष इम्रान शेख, जावेद जहागीरदार, मुख्याधिकारी सचिन बांगर, शिवाजीराव थोरात, अनिल देशमुख, विश्वास मुर्तडक, पूनम मुंदडा, वैशाली बर्गे, नजमा मणियार, शालिनी ढोले, जुलेशा शेख, शोभा परदेशी, अल्पना तांबे, रत्नमाला लहामगे, प्रमिला अभंग, नितीन अभंग, सुमित्रा दिड्डी, गजेंद्र अभंग आदी मान्यवर उपस्थित होते.
मौलाना आझाद मंगल कार्यालय नूतनीकरण, प्रीमिअम खाते योजनेअंतर्गत विकसित स्वातंत्र्यवीर सावरकर मंगल कार्यालय नूतनीकरण, नेहरू गार्डन मत्स्यालय सुशोभीकरण, जानकीनगर रेंधे गार्डन, साकार कॉलनी खुल्या जागेत रोझ गार्डन व जॉगिंग, प्रभाग क्र १ ते ७ मधील रस्ते डांबरीकरण, ट्रिमिक्स काँक्रिटीकरण आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला.
आ. थोरात म्हणाले, संगमनेर शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. निळवंडे धरणातून थेट पाइपलाइन योजना पूर्ण करून मोठे ऐतिहासिक काम पूर्ण झाले आहे. मोठी बाजारपेठ असल्याने नागरिकांचा ओघ कायम शहराकडे असतो. शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नगरपालिकेने उपक्रम राबविले आहेत. यापुढेही विकासकामे सुरूच राहतील.
दुर्गाताई तांबे म्हणाल्या, आमदार बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहरात नगरपालिकेच्या वतीने सतत विविध विकासयोजना व उपक्रम राबविले जात आहेत. इतर शहरांच्या तुलनेत आपले शहर पुढे असून, सर्व उपक्रमांमध्ये विशेष स्वच्छ व सुंदर शहर अभियानांतर्गत नागरिक व महिलांचा सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन ही त्यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश पर्बत यांनी केले, तर आभार उपनगराध्यक्ष इम्रान शेख यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)