शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात जळीतकांड; मध्यरात्री अज्ञाताने विविध भागातील तीन वाहने जाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 11:30 IST

संगमनेर शहरात विविध भागात अज्ञातांनी घरासमोर उभी असलेली दोन दुचाकी व एक ऑटो रिक्षा ही वाहने पेटविल्याची घटना घडली आहे. 

संगमनेर( जि. अहमदनगर) : संगमनेर शहरात विविध भागात अज्ञातांनी घरासमोर उभी असलेली दोन दुचाकी व एक ऑटो रिक्षा ही वाहने पेटविल्याची घटना शुक्रवारी (दि. १३) रात्री दोन ते तीन वाजलेच्या सुमारास घडली. गतवर्षी संगमनेर नगर परिषदेच्या क्रीडांगण समोरील अभंग मळा परिसरात अशीच घटना घडली होती. अज्ञाताने दोन दुचाकी आणि एक चारचाकी अशी एकूण तीन वाहने पेटवून दिली होती. या घटनेमुळे परिसर हादरला आहे.         शहरातील विविध भागात सिरीयल पद्धतीने मध्यरात्री अंदाजे दोन ते तीन दरम्यान अज्ञातांनी वाहने पेटविली. घोडेकरमळा येथील जय तपेंद्रबहादुर सूनार यांची घरासमोरील ज्युपिटर दुचाकी  (एम.एच.१७ सी.एल.७२४२) पेटविली. सुनार यांना परिसरातील नागरिकांनी कळविल्यानंतर घरातील सदस्यांनी दुचाकीची आग विझविली. तोपर्यंत दुचाकीचे जळून मोठे नुकसान झाले. त्याच दरम्यान सुनार यांचे अकोले नाका येथील मित्र  कपिल दिलीप शिंदे यांची ऑटो रिक्षा (एम.एच.१७ एन. १११७) व  जेधे कॉलनी येथील आकाश बाळू जेधे यांची दुचाकी (क्र. एम.एच.१७ बी. डब्लु. ४८२४) अज्ञातांनी पेटविली.यात आॅटोचे जळून मोठे नुकसान झाले.       शहरात वाहने पेटवून देण्याची ही दुसरी घटना आहे. दुचाकी चोरणे किंवा दुचाकीमधील इंधन चोरण्याचे प्रकार यापूर्वी घडत आले आहेत. पण वाहने जाळण्याची घटना घडत असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी जय तपेंद्रबहादुर सूनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरूनअज्ञातांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक खाडे हे करीत आहेत.

टॅग्स :fireआगAhmednagarअहमदनगरbikeबाईकauto rickshawऑटो रिक्षा