संगमनेरात ३८ शिक्षकांनी बजावला रक्तदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST2021-07-17T04:17:40+5:302021-07-17T04:17:40+5:30
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करत शिबिराला सुरूवात करण्यात आली. आमदार डॉ. सुधीर ...

संगमनेरात ३८ शिक्षकांनी बजावला रक्तदानाचा हक्क
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करत शिबिराला सुरूवात करण्यात आली. आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी साईलता सामलेटी, ओहरा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विजय कोडूर, विस्तार अधिकारी के. के. पवार, केंद्रप्रमुख शिवनाथ पारधी, विद्या भागवत, यशवंत आंबेडकर, कानिफनाथ कोळेकर, दशरथ धादवड, प्रभाकर रोकडे, अशोक गोसावी, सोमनाथ मदने, सुखदेव इल्हे, अनिल कडलग, एकनाथ साबळे, योगेश मोरे, हौशिराम मेचकर, ‘लोकमत’ चे संगमनेर तालुका प्रतिनिधी शेखर पानसरे, जाहिरात विभाग प्रतिनिधी अश्विन मुथा, नंदकिशोर ढोकरे अर्पण रक्तपेढीच्या वरिष्ठ तंत्रज्ञ सुजाता वाकचौरे, राहुल हुंबे यांसह अर्पणा वैद्य, विजया भांदुर्गे, श्रद्धा जोगदंड, अनंत शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
---------------
रक्तदाते
सुखदेव इल्हे, सोमनाथ मदने, पंकज कवडे, राजेंद्र शिंदे, संजय कानवडे, निलेश हारदे, विनोद गोरे, दिनकर यादव, गोरक्ष सरोदे, शिवाजी चत्तर, महेंद्र आंत्रे, कुमार झराडे, राजेंद्र कडलग, रोहिदास गाडेकर, उमेश काळे, प्रवीण गाडेकर, शिवाजी आव्हाड, संदीप कडलग, संजय गवळी, ज्ञानेश्वर फटांगरे, संदीप मोरे, धनंजय रूपवते, अरुण पानसरे, मनोज आहेर, सुनील मंडलिक, लक्ष्मण भालेराव, शिवनाथ पारधी, बाळासाहेब जाधव, संदीप जाधव, बाळासाहेब गाडेकर, अनिल गाडेकर, नानासाहेब देव्हारे, प्रभाकर काळे, प्रतीक डोरगे, हौशिराम मेचकर,
-----------
८१ वेळा बजावला रक्तदानाचा हक्क
संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रूक येथील जिल्हा परिषदेच्या गोर्डे मळा शाळेतील उपक्रमशील शिक्षक आणि आधार फाउंडेशनचे समन्वयक सुखदेव इल्हे यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान करत आतापर्यंत ८१ वेळा रक्तदानाचा हक्क बजावला.
------------