संगमनेर कारागृहात आरोपीने ठोकली धूम
By Admin | Updated: April 5, 2017 15:21 IST2017-04-05T15:03:22+5:302017-04-05T15:21:06+5:30
संगमनेर शहरात भरदिवसा गोळीबार करुन दशहत पसरविणारा गुंड वेणूनाथ उर्फ पिंट्या माधव काळे याने संगमनेरच्या कारागृहात बुधवारी धूम ठोकल्याची घटना घडली़

संगमनेर कारागृहात आरोपीने ठोकली धूम
आॅनलाईन लोकमत
संगमनेर (अहमदनगर), दि़ 5 - संगमनेर शहरात भरदिवसा गोळीबार करुन दशहत पसरविणारा गुंड वेणूनाथ उर्फ पिंट्या माधव काळे याने संगमनेरच्या कारागृहात बुधवारी धूम ठोकल्याची घटना घडली़
काही दिवसांपूर्वी वेणूनाथ उर्फ पिंट्या माधव काळे याने भरदिवसा शहरात गोळीबार केला होता़ या गोळीबारात एक जण जखमी झाला होता़ याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी काळे याला अटक करुन न्यायालयात सादर केले होते़ न्यायालयाच्या आदेशानुसार काळे हा संगमनेर कारागृहात शिक्षा भोगत होता़ दरम्यान बुधवारी सकाळी साडेसात वाजता कारागृहातील कचरा डब्यात भरण्यासाठी पोलिसांनी दरवाजा उघडला होता़ पोलिसांनी दरवाजा उघडल्याचे पाहताच काळे याने कारागृहातून धूम ठोकली़