महसूल अधिकाऱ्यांवर वाळू तस्करांची दगडफेक

By Admin | Updated: June 22, 2014 00:22 IST2014-06-21T23:56:41+5:302014-06-22T00:22:47+5:30

श्रीगोंदा : सांगवी दुमाला शिवारातील भीमा नदी पात्रात वाळू तस्करी रोखण्यासाठी तहसीलदार डॉ.विनोद भामरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल अधिकाऱ्यांच्या पथकावर वाळू तस्करांना दगडफेक केली.

Sandstone smugglers on revenue officials | महसूल अधिकाऱ्यांवर वाळू तस्करांची दगडफेक

महसूल अधिकाऱ्यांवर वाळू तस्करांची दगडफेक

श्रीगोंदा : सांगवी दुमाला शिवारातील भीमा नदी पात्रात वाळू तस्करी रोखण्यासाठी तहसीलदार डॉ.विनोद भामरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल अधिकाऱ्यांच्या पथकावर वाळू तस्करांना दगडफेक केली. वाळू उपसा करणारे सहा जेसीबी वाळू तस्करांनी पळवून नेले. दगडफेकीत दुर्दैवाने कोणी जखमी झाले नाही. ही घटना शनिवारी दुपारी १२-३० वाजण्याच्या सुमारास घडली.
यासंदर्भात काष्टीचे कामगार तलाठी लक्ष्मण गराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात ५०-६० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. समजलेली अधिक माहिती अशी की, सांगवी दुमाला शिवारातील भीमा नदी पात्रात जेसीबीच्या सहाय्याने बेकायदा वाळू उपसा चालू आहे, अशी माहिती समजली. त्यानुसार तहसीलदार भामरे यांनी मंडल अधिकारी संजय जगताप, एस. आर. दीक्षित, कामगार तलाठी लक्ष्मण गराडे, जयसिंग मापारी, तुकाराम भोसले, धोंडीबा मेहत्रे, संतोष सोबले यांच्यासह भीमा नदीपात्रात छापा टाकला. तहसीलदारांच्या सुचनेनुसार अधिकाऱ्यांनी सहा जेसीबी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला़ मात्र, वाळू तस्कारांंनी पथकावर थेट दगडफेक सुरू केली. महसूल अधिकारी पाहताच सहा जेसीबी पळून नेले. महसूल खात्याचे पथक रिकाम्या हातांनी जीव मुठीत धरून श्रीगोंद्याला परतले. सांगवी शिवारातील वाळू उपसा बंद करण्यासाठी छापा टाकावयाचा आहे. काष्टी परिक्षेत्रातील पोलिसांना माहिती दिली होती. परंतु काष्टीचे पोलीस उशिरा सांगवीत पोहचले. पोलीस उशिरा का पोहचले याचीही चौकशी करणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)
श्रीगोंद्यातील वाळू तस्करी रोखण्यासाठी छापा मोहीम अधिक व्यापक करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत वाळू तस्करी रोखणार आहे. ज्या गावात वाळू तस्करी होती याची खरी माहिती न कळविल्यास संबंधीत तलाठ्यांवर कारवाई करणार आहे.
-डॉ.विनोद भामरे
तहसीलदार,

Web Title: Sandstone smugglers on revenue officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.