‘खेलो मास्टर’च्या सरचिटणीसपदी संदीप घावटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:25 IST2021-08-14T04:25:38+5:302021-08-14T04:25:38+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेतील क्रीडाशिक्षक संदीप घावटे यांची खेलो मास्टर महाराष्ट्र ...

‘खेलो मास्टर’च्या सरचिटणीसपदी संदीप घावटे
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेतील क्रीडाशिक्षक संदीप घावटे यांची खेलो मास्टर महाराष्ट्र असोसिएशनच्या वतीने जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. संदीप घावटे यांनी क्रीडा क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांना पुणे येथे झालेल्या खेलो मास्टर गेम असोसिएशन राज्यात सभेत राज्य सरचिटणीस अमन चौधरी, राष्ट्रीय सरचिटणीस शैलेंद्र सिंग यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. खेलो मास्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून ३० वर्षांपुढील खेळाडूंसाठी १६ क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर केले जाणार आहे. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस शैलेंद्र सिंग, राज्याध्यक्ष क्षितिज ठाकूर, सरचिटणीस अमन चौधरी, उपाध्यक्ष अभय छाजेड, राजेंद्र कोतकर, खजिनदार सुनील हामद उपस्थित होते. या निवडीचे दिनेश भालेराव, मुख्याध्यापक संपतराव गाडेकर, कांतीलाल धुळे आदींनी स्वागत केले.
----
११ संदीप घावटे
110821\49044006img-20210808-wa0082.jpg
संदीप घावटे यांच्या सरचिटणिस पदी निवडीनिमित्त सत्कार करताना मान्यवर .