संदीप वराळ हत्येप्रकरणी ११ जणांवर मोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 14:00 IST2017-07-21T14:00:36+5:302017-07-21T14:00:36+5:30
प्रवीण रसाळ याच्यासह ११ जणांविरोधात नाशिक मोका न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे़

संदीप वराळ हत्येप्रकरणी ११ जणांवर मोका
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील निघोज येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप वराळ यांच्या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार प्रवीण रसाळ याच्यासह ११ जणांविरोधात नाशिक मोका न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे़
या प्रकरणातील तपासी अधिकारी आनंद भोईटे यांनी न्यायालयात ७०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे़ २१ जानेवारी रोजी वराळ यांच्या निघोज येथे भर चौकात टपरीतून बाहेर ओढून दहा ते बारा जणांच्या टोळीने निर्घून हत्या केली होती़ याप्रकरणी पोलीसांनी आरोपींना अटक करत या प्रकरणाला मोका लावण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरिक्षक यांच्याकडे पाठविला होता़ या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे़