आनलाईन लिलावात अडकले वाळू विक्रीचे गाडे
By Admin | Updated: December 16, 2015 23:10 IST2015-12-16T22:58:01+5:302015-12-16T23:10:13+5:30
अहमदनगर : वाळू विक्रीसाठी चार वेळा आॅनलाईन निविदा मागविण्यात आल्या़ मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही़

आनलाईन लिलावात अडकले वाळू विक्रीचे गाडे
अहमदनगर : वाळू विक्रीसाठी चार वेळा आॅनलाईन निविदा मागविण्यात आल्या़ मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही़ वारंवार निविदा नोटीस प्रसिद्ध करूनही व्यावसायिक येत नसल्याने आॅनलाईन लिलावात वाळू विक्रीचे गाडे रुतले आहे़ यावर महसूल विभागाचा कारवाईचा प्र्रयोगही फसला असून, कारवाईचा परिणाम शून्य असल्याचे वाळू पट्टे विक्रीवरून स्पष्ट झाले आहे़
शासकीय कामे घेण्यासाठी ठेकेदारांच्या रांगा लागतात़ शासकीय दरापेक्षाही कमी दरात कामे करण्याची ठेकेदारांची तयारी असते़ वाळू विक्रीत मात्र या उलट स्थिती आहे़ बाजारातील वाळूच्या दरापेक्षा शासकीय दर कमीच आहेत़ मात्र तरीही वाळू पट्टे विक्रीला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे़ प्रतिसाद मिळावा, म्हणून कारवाया करण्याचेही आदेश दिले गेले़ वर्षभरात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारी ६२९ वाहने पकडली व २ कोटी ७३ लाखांचा दंडही वसूल केला़ परंंतु, कारवाईचा परिणाम लिलावात दिसला नाही़ गौण खनिज विभागाने एकूण चारवेळा आॅनलाईन निविदा नोटीस प्रसिद्ध केली़ जिल्ह्यातील २० वाळू पट्टे विक्रीसाठी आॅनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात आली़