रस्त्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:46+5:302021-06-09T04:26:46+5:30
सुमारे दोन किलोमीटर अंतराचा या रस्त्यांचे काम अनेक वर्षांपासून झालेले नाही. पावसाळ्यात या रस्त्याची प्रचंड दुरावस्था होते. त्यामुळे शेतकऱ्यांना ...

रस्त्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात
सुमारे दोन किलोमीटर अंतराचा या रस्त्यांचे काम अनेक वर्षांपासून झालेले नाही. पावसाळ्यात या रस्त्याची प्रचंड दुरावस्था होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दळणवळणासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासन या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप लाभधारक शेतकऱ्यांनी केला आहे. लवकरच या रस्त्याच्या दुतर्फा साईड गटारे, खडीकरण गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या समस्याकडे गांभीर्याने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाऊसाहेब आढाव, दत्तात्रय सांळुके ,भास्कर वने, रवींद्र वने, अशोक शेळके, सुभाष चौधरी, चंद्रकांत ढेरे,गणेश साळुंके, रामेश्वर साळुंखे,संभाजी वने, गणेश बोबडे,महेश आढाव, भारत गुंजाळ,संजय शेळके, गोरक्षनाथ शेळके, बाळासाहेब शेळके, संदीप शेळके, सुनील गुंजाळ, सुधीर गुंजाळ, कुशाबापू ढेरे,गोविंद ढेरे आदिंनी दिला आहे.
..........
या रस्त्या संदर्भात ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली असताना तुमच्या रस्त्याचे काम मंजुरीसाठी पाठविले आहे, असे सांगितले जाते. मंजुरी आली की काम सुरू करू, अशी चार वर्षांपासून उडवाउडवीची उतरे देऊन वेळी मारून नेण्याचे काम या सत्ताधारी मंडळीकडून केले जात आहे.
-
दत्तात्रय सांळुके, शेतकरी
.............
हा रस्ता खुप जुना आहे. या रस्त्याची नकाशात नोंद असताना वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला. माझा जन्म झाल्यापासून या रस्त्यावर एका साधा खडादेखील टाकला नाही.
-भास्कर वने, शेतकरी