अहमदनगरमधील ‘त्या’ घटनेचा सम्राट अशोक सेनेने केला निषेध, आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
By संतोष येलकर | Updated: August 28, 2023 18:22 IST2023-08-28T18:21:25+5:302023-08-28T18:22:01+5:30
Ahmednagar: अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव येथे तीन लहान मुलांना अमानुष मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करीत सोमवारी अकोल्यात सम्राट अशोक सेनेच्यवातीने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने करण्यात आली.

अहमदनगरमधील ‘त्या’ घटनेचा सम्राट अशोक सेनेने केला निषेध, आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
अकोला - अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव येथे तीन लहान मुलांना अमानुष मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करीत सोमवारी अकोल्यात सम्राट अशोक सेनेच्यवातीने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना अटक करुन कारवाइ करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या गृह मंत्र्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.कबुतरे चोरल्याच्या संशयावरुन हरेगाव येथे तीन लहान मुलांना झाडाला लटकवून अमानुष मारहाण करण्यात आली.तसेच यासंदर्भात कोणाला काही सांगीतल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
या घटनेचा निषेध करीत सम्राट अशोक सेना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच या घटनेतील आरोपींना अटक करुन त्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे व त्यांची संपत्ती जप्त करण्याची मागणी करण्यात आली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. यावेळी सम्राट अशोक सेनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश शिरसाट यांच्यासह अजय क्षिरसागर, हिरा घुमरे, दिपक शिरसाट, सनी शिरसाट, सनी मृदंगे, सुरज वानखडे, सोनू शेगोकार, गुणवंत शिरसाट, अमोल वानखडे, शुभम गोपनारायण, पवन वानखडे, पवन साबने आदी उपस्थित होते.