एकाच दिवशी तीन महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:39 IST2021-02-05T06:39:08+5:302021-02-05T06:39:08+5:30
शुक्रवारी दुपारी ३ वाजता शहरातील पाइपलाइनरोडवरील दत्तनगर येथून पायी जात असताना छाया सुनील जगताप यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे ...

एकाच दिवशी तीन महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडले
शुक्रवारी दुपारी ३ वाजता शहरातील पाइपलाइनरोडवरील दत्तनगर येथून पायी जात असताना छाया सुनील जगताप यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे गंठण दुचाकीवरून आलेल्या तिघांनी आरेबाडून नेले. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता पाइपलाइनरोडवरील एकविरा चौक परिसरात लतिका लक्ष्मण बोराटे यांचे १७ ग्रॅम वजनाचे दागिने याच पद्धतीने चोरट्यांनी हिसकावून नेले. सायंकाळी सव्वापाच वाजता शहरातील सिव्हिल हडको परिसरातील निसार हॉस्पिटलजवळ सुमन सुरेश कुलकर्णी (वय ६७) या वृद्ध महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ओरबाडून नेले. कुलकर्णी यांच्या घरासमोरच ही घटना घडली. या घटनेनंतर पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे व पोलीस निरिक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या घटनांबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. शहरात चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्येवाढ झाली असून, चोरट्यांच्या भीतीने घराबाहेर पडतानाही महिलांना भीती वाटत आहे. या चोरट्यांचा बंदाबस्त तरकण्यात पोलिसांना अपयश येत आहे.