लीना ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला संभाजी राजे यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:43+5:302021-06-21T04:15:43+5:30
शोरूमचे संचालक शेखर साबळे, सुधाकर सरोदे, शैलेंद्र साबळे, आनंद हासे, अविनाश गुंजाळ उद्योजक संदीप देशमुख आदींनी यावेळी स्वागत ...

लीना ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला संभाजी राजे यांची भेट
शोरूमचे संचालक शेखर साबळे, सुधाकर सरोदे, शैलेंद्र साबळे, आनंद हासे, अविनाश गुंजाळ उद्योजक संदीप देशमुख आदींनी यावेळी स्वागत केले.
संगमनेरातील नाशिक-पुणे महामार्गावरील टाटा मोटर्सचे जिल्ह्यातील अधिकृत लीना ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे अद्ययावत शोरूम आहे.या शोरूममधून यापूर्वी ‘बीएस-६’ प्रणालीची पहिली टाटा मॅजिक ॲम्बुलन्स वितरित करण्यात आली होती.तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील सकल जैन समाजाच्या वैकुंठ मित्रमंडळाला या ॲम्बुलन्सचे वितरण करण्यात आले होते. या सर्व बाबीबद्दल खा. संभाजीराजे यांना माहिती दिल्यानंतर राजे यांनी या शोरूम संचालकाचे कौतुक केले.
दरम्यान, सध्या या शोरूममध्ये टाटा इंट्रा या माल वाहतूक मोटारीसाठी ५.५५ टक्के व्याज दरावर कर्ज सुविधा उपलब्ध आहे. तसेच जून मान्सून बोनांझा या योजनेत टाटा योध्दा पिकअप या मालवाहतूक गाडीवर ५० हजार रुपयापर्यंत कमीत कमी डाऊन पेंमेट व सहा वर्षाची बायबँक सवलत उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शोरूमचे संचालक किशोर साबळे यांनी यानिमित्ताने केले आहे.
(वा.प्र.)