‘सॅल्यूट टू कोव्हीड वॉरिअर्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:30 IST2021-02-05T06:30:54+5:302021-02-05T06:30:54+5:30
कोरोना काळात महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या सर्वांसाठीच यातून सद्भावना व्यक्त करण्यात आली. शारीरिक अंतराचे नियम पाळून ही बैठक करण्यात आली ...

‘सॅल्यूट टू कोव्हीड वॉरिअर्स’
कोरोना काळात महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या सर्वांसाठीच यातून सद्भावना व्यक्त करण्यात आली. शारीरिक अंतराचे नियम पाळून ही बैठक करण्यात आली होती. प्रमुख अतिथी म्हणून घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया उपस्थित होते. प्राचार्य भाऊसाहेब शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर व कला शिक्षक सत्यानंद कसाब यांच्या संकल्पनेतून ही रचना साकारण्यात आली. त्यांना प्रा.भीमराज काकड, भारत सोनवणे, सर्व शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी अरुण डोखे, कचेश्वर पवार, रविंद्र काशिद, प्रकाश नेहे, गोरक्षनाथ कांबळे यांनी मदत केली.
----------
फोटो : २७‘सॅल्यूट टू कोव्हीड वॉरिअर्स’
..
ओळी-संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील सह्याद्री संस्थेच्या डी. के. मोरे विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन आगळ्या- वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांची बसण्यासाठी रचना यंदा ‘सॅल्यूट टू कोव्हीड वॉरिअर्स’ अशी करण्यात आली होती.