मृताच्या जमिनीची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:24 IST2021-01-16T04:24:19+5:302021-01-16T04:24:19+5:30

अहमदनगर : मृत व्यक्तीच्या जागी बनावट मालक उभा करून २२ एकर जमिनीची विक्री करून खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला शुक्रवारी ...

Sale of deceased land | मृताच्या जमिनीची विक्री

मृताच्या जमिनीची विक्री

अहमदनगर : मृत व्यक्तीच्या जागी बनावट मालक उभा करून २२ एकर जमिनीची विक्री करून खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर शहरातून अटक केली. पुरुषोत्तम बाबूराव कुरुमकर (वय ४०, रा. लिंपनगाव, ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कुरुमकर याच्या साथीदारांनी २७ मार्च २०१८ राेजी मृत व्यक्तीच्या नावाने एकनाथ बाळासाहेब बांदल यांना जमिनीची विक्री केली होती. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर बांदल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून आरेापी कुरुमकर हा फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, आरोपी नगर शहरातील लालटाकी परिसरात येणार आहे. माहितीनुसार पोलीस पथकाने कुरुमकर याला अटक केली. या आरोपीविरोधात कर्जत व श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणखी काही गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Sale of deceased land