सखी मंच तर्फे ‘‘जल्लोष सूर-तालाचा’’
By Admin | Updated: September 27, 2014 23:08 IST2014-09-27T23:00:44+5:302014-09-27T23:08:00+5:30
अहमदनगर : लोकमत सखी मंच आणि सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटस् यांच्या संयुक्त विद्यमाने ‘‘जल्लोष सूर-तालाचा ’’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

सखी मंच तर्फे ‘‘जल्लोष सूर-तालाचा’’
अहमदनगर : लोकमत सखी मंच आणि सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटस् यांच्या संयुक्त विद्यमाने ‘‘जल्लोष सूर-तालाचा ’’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दर्जेदार नृत्य व हिंदी-मराठी गीतांची धम्माल मैफील यानिमित्ताने होणार आहे.
येथील सहकार सभागृह येथे दि. ३० सप्टेंबर १४ रात्री ८ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध कलावंत त्यागराज खाडीलकर, प्रशांत नासेरी, प्रियंका बर्वे हे आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. या कार्यक्रमाकरिता प्रवेशिका आवश्यक आहे. रविवार, दि. २८ रोजी लोकमत भवन, सावेडी रोड येथे सखी मंचचे ओळखपत्र दाखवून प्रवेशिका घेऊन जाव्यात. एका प्रवेशिकेवर दोघांना प्रवेश देण्यात येईल. अधिक माहितीकरीता लोकमत भवन, सावेडी रोड, अहमदनगर येथे ९८६०५३४४१४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)