मुस्लीम आरक्षणासाठी शरद पवारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:03+5:302021-02-05T06:28:03+5:30

अहमदनगर: महाविकास आघाडी सरकारने मुस्लीम समाजास ५ टक्के आरक्षण त्वरित लागू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उबेद शेख यांनी ...

Sakade to Sharad Pawar for Muslim reservation | मुस्लीम आरक्षणासाठी शरद पवारांना साकडे

मुस्लीम आरक्षणासाठी शरद पवारांना साकडे

अहमदनगर: महाविकास आघाडी सरकारने मुस्लीम समाजास ५ टक्के आरक्षण त्वरित लागू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उबेद शेख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नुकतेच नगर दौऱ्यावर आले होते. यावेळी उबेद शेख यांनी पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की आघाडी सरकारने २०१४ मध्ये मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण जाहीर केले होते, तसेच उच्च न्यायालयानेही त्यास मंजुरी दिली हाेती. मुस्लीम समाजाची शैक्षणिक प्रगती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळाल्यास परिस्थितीने मागासलेल्यांना फायदा होईल. यामुळे समाजाला मुख्य प्रवाहात आणणे शक्य होईल. त्यासाठी मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण लागू करण्यात यावे, अशी मागणी शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

..

सूचना फोटो आहे.

Web Title: Sakade to Sharad Pawar for Muslim reservation