संत विचाराने जीवन बदलते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:31 IST2021-02-05T06:31:27+5:302021-02-05T06:31:27+5:30
ओबीसी, व्हीजे एनटी जनमोर्चाच्यावतीने भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी लहामगे बोलत होते. यावेळी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष ...

संत विचाराने जीवन बदलते
ओबीसी, व्हीजे एनटी जनमोर्चाच्यावतीने भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी लहामगे बोलत होते. यावेळी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, डॉ.श्रीकांत चेमटे, अॅड. बाळासाहेब खांडरे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते.
ओबीसी, व्हीजे,एनटी. संघटनेच्यावतीने बहुजन समाजाला एकत्र करण्याचे सुरू केलेल्या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी लहामगे यांनी केले. अभिषेक कळमकर म्हणाले, नगरमध्ये नुकताच झालेला ओबीसी मेळाव्याचा समाजात सकारात्मक संदेश आहे. अशा संघटना राजकारणाच्या वलय असलेल्या असून, त्या समाजकारणाकडे वळतात ही स्तुत्य अशी कृती आहे. यावेळी दत्ता जाधव, प्रकाश सैंदर, डॉ. सुदर्शन गोरे, अनिल इवळे, श्याम औटी, जालिंदर बोरुडे, शशिकांत पवार, श्रीकांत मांढरे, हर्षल म्हस्के, परेश लोखंडे, मुन्ना भिंगारदिवे आदी उपस्थित होते.