संस्थान विकणार साईमूर्ती, फोटो
By Admin | Updated: May 28, 2014 00:13 IST2014-05-27T23:50:25+5:302014-05-28T00:13:20+5:30
शिर्डी: साई संस्थान साईबाबांच्या मूर्ती व फोटो फे्रम विकण्याचाही विचार करीत आहे़ येत्या दोन दिवसांत व्यवस्थापनाच्या होणार्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे़
संस्थान विकणार साईमूर्ती, फोटो
शिर्डी: साई संस्थान साईबाबांच्या मूर्ती व फोटो फे्रम विकण्याचाही विचार करीत आहे़ येत्या दोन दिवसांत व्यवस्थापनाच्या होणार्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे़ शिर्डी गेली दोन-तीन वर्षे आर्थिक मंदीने होरपळत आहे़ संस्थानच्या साईआश्रमचे दर कमी केल्याने शहरातील लॉजिंग व्यवसायावर परिणाम झाला़ आता संस्थान साईबाबांच्या पितळ व ब्रान्झ धातूच्या मूर्ती विक्रीस ठेवण्याचा विचार करीत आहे़ साई कॉम्प्लेक्समधील संस्थानच्या गाळ्यात या मूर्तीची, साईबाबांच्या फोटोंची विक्री करण्याचा संस्थानचा विचार आहे़ यामुळे शहरातील आणखी एक व्यवसाय उद्ध्वस्त होईल, अशी भीती सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे यांनी व्यक्त केली आहे़ याशिवाय संस्थान विमानतळ विकास प्राधिकरणालाही शिर्डी विमानतळासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेणार आहे़ मात्र हा निधी विमानतळासाठी न वापरता विमानतळाला जोडणार्या शिर्डी ते काकडी या रस्त्यासाठी वापरावा असा आम्ही आग्रह धरणार असल्याचे संस्थानच्या अधिकार्यांनी सांगितले.़ गेल्या चार वर्षांपूर्वी संस्थानने पन्नास कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता़ या विरोधात शिर्डीत आंदोलने होवूनही संस्थानने ४५ कोटींचा निधी दिला होता़ त्यातील उर्वरित पाच कोटींचा निधी आता देण्यात येणार आहे़ हा निर्णय न्यायालयाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले़ (वार्ताहर)