शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू -व्यंकय्या नायडु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 14:19 IST

साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू होते. हिंदू आणि सूफी विचारधारेचा सुंदर समन्वय त्यांच्या विचारात आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्वज्ञानाला साजेसा मानवसेवा व एकात्मतेचा संदेश त्यांनी जगाला दिला आहे. त्यांचा हा संदेश जगात पोहोचवावा, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु यांनी केले.

शिर्डी : साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू होते. हिंदू आणि सूफी विचारधारेचा सुंदर समन्वय त्यांच्या विचारात आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्वज्ञानाला साजेसा मानवसेवा व एकात्मतेचा संदेश त्यांनी जगाला दिला आहे. त्यांचा हा संदेश जगात पोहोचवावा, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु यांनी केले.साईबाबांचा संदेश प्रेम, वात्सल्य आणि माणसाला एकमेकांच्या हृदयाशी जोडण्याचा आहे. भेदभाव विसरून माणसावर प्रेम केल्यास श्रद्धा आणि भक्तीचा सुंदर संगम जीवनात होतो. अशा विचारांची प्रेरणा शिर्डीतून मिळते, असे मतही नायडु यांनी व्यक्त केले.साईबाबा संस्थान आयोजित जागतिक साई मंदीर विश्वस्तांच्या परिषदेचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते आज उद्घाटन झाले. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे, दिलीप गांधी, पोस्ट मास्तर जनरल हरीश्चंद्र अग्रवाल, नगराध्यक्षा योगिता शेळके, संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, मोहन जयकर, प्रताप भोसले, मुख्यकार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल आदींची उपस्थिती होती. यावेळी पोस्टाच्या माय स्टॅम्पचे व संस्थान व्यवस्थापनाच्या वर्षपूर्ती अंकाचे प्रकाशन करण्यात आले.आपल्या भाषणाची सुरूवात मराठीत करणा-या उपराष्ट्रपतींनी हिंदी, इंग्रजी, तेलगु व संस्कृत भाषेतून उपस्थितांशी हृदयस्पर्शी संवाद साधला. वंचित आणि गरजूंची सेवा हीच खरी साई भक्ती व असहाय्य लोकांविषयी केवळ सहानुभूती न दाखविता त्यांच्या मदतीला धावून जाणे ही खरी प्रार्थना आहे. केवळ पूजाविधीत न गुंतता सद्बुद्धी, सदाचार आणि सेवाभावनेने मन:शांती मिळते, असे ते म्हणाले.मानवसेवा हीच माधवसेवा असून माणसाबरोबरच पशू, पक्षी आणि निसर्गावर प्रेम करायला आपली संस्कृती शिकविते. हेच तत्वज्ञान साईबाबांनीदेखील सांगितले. त्यामुळे परिषदेच्या माध्यमातून चांगल्या अनुभवाचे आणि कल्पनांचे आदानप्रदान करीत भारतीयता आणि भारतीय संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न व्हावा अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSaibaba Mandirसाईबाबा मंदिरshirdiशिर्डी