शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबा मंदिराच्या कळसाला पुन्हा सुवर्ण मुलामा; सोळा वर्षांनंतर पुन्हा काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 23:36 IST

हैदराबाद येथील साईभक्त विजयकुमार यांच्या देणगीतून हे काम केले जात आहे. यापूर्वी जुलै २००७ मध्येही विजयकुमार यांनीच कळसाला सुवर्ण मुलामा दिला होता.

शिर्डी : आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डी येथील श्री साई समाधी मंदिराच्या कळसाला तब्बल सोळा वर्षांनंतर पुन्हा एकदा सुवर्ण मुलामा देण्याचे काम सुरू आहे. हैदराबाद येथील साईभक्त विजयकुमार यांच्या देणगीतून हे काम केले जात आहे. यापूर्वी जुलै २००७ मध्येही विजयकुमार यांनीच कळसाला सुवर्ण मुलामा दिला होता.

साईबाबा संस्थान हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या देणगीतून अनेक सामाजिक कार्ये चालतात. विजयकुमार यांच्यासारख्या अनेक साईभक्तांनी मंदिराला सोने आणि चांदीच्या वस्तू दान केल्या आहेत. या दानामुळे मंदिराची शोभा वाढली आहे, तसेच साईबाबांच्या कार्यालाही हातभार लागला आहे.

विजयकुमार हे अनेक वर्षांपासून साईबाबांचे भक्त आहेत. कळसाला सुवर्ण मुलामा देण्याची त्यांची ही दुसरी वेळ आहे. या कामासाठी किती सोने वापरले जात आहे, हे त्यांनी गुप्त ठेवले आहे.- गोरक्ष गाडीलकर, सीईओ.

विद्युत रोषणाई टाळण्याचा सल्लाविजयकुमार यांनी सुवर्ण मुलामा दिलेल्या कळसाला विद्युत रोषणाई न करण्याची सूचना साईबाबा संस्थानला दिली आहे. तिरुपती बालाजी आणि द्वारका येथील मंदिरांच्या उदाहरणांचा हवाला देत, विद्युत बल्बच्या उष्णतेमुळे सुवर्ण मुलामाला तडे जातात, असे त्यांचे म्हणणे आहे.

शिखराची झळाळी वाढेलसाईबाबांच्या भक्तांसाठी ही एक आनंदाची बाब आहे. मंदिराच्या कळसाला पुन्हा एकदा सुवर्ण मुलामा मिळाल्याने मंदिराच्या शिखराची झळाळी वाढेल. सप्टेंबर २०२३ मध्ये मंदिराच्या गाभाऱ्यालाही आतून सुवर्ण मुलामा देण्यात आला आहे. 

टॅग्स :shirdiशिर्डीSaibaba Mandirसाईबाबा मंदिर