साई संस्थानचा ऑक्सिजन प्रकल्प रुग्णसेवेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:15+5:302021-07-07T04:27:15+5:30
कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाच संस्थानने अवघ्या महिनाभरात युद्धपातळीवर ऑक्सिजन प्लान्टची उभारणी केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री ...

साई संस्थानचा ऑक्सिजन प्रकल्प रुग्णसेवेत दाखल
कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाच संस्थानने अवघ्या महिनाभरात युद्धपातळीवर ऑक्सिजन प्लान्टची उभारणी केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्यासह अनेक उच्चपदस्थांनी १८ मे रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन केले.
रिलायन्स फाउंडेशनने देणगी स्वरूपात हा प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास एक कोटी नव्वद लाख रुपये खर्च केले आहेत. तर या प्रकल्पाच्या वातानुकूलीत शेडसारख्या पायाभुत सुविधांसाठी साईभक्त के.व्ही. रमणी यांनीही पंचेचाळीस लाखांची मदत केली आहे. पुण्याच्या अॅटलस कॉपको कंपनीने रिलायन्स फाउंडेशनच्या खर्चाने साईनाथ रुग्णालयात हा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात निर्माण होणारा ऑक्सिजन वायू ९३ टक्के शुद्धतेचा आहे. या प्रकल्पातून साईनाथ रुग्णालयातील अंदाजे २५० रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करता येईल. या प्रकल्पासाठी कोणत्याही स्वरूपाच्या कच्च्या मालाची आवश्यकता नसल्याचे बगाटे यांनी सांगितले. यावेळी डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, राजेंद्र जगताप, लंके, वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे आदींची उपस्थिती होती.