शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

कोविडच्या संकटात साई संस्थानने माणुसकी जपली : उद्धव ठाकरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 18:56 IST

कोविडच्या संकटात ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प व आरटीपीसीआर लॅबची निर्मिती करून साई संस्थानने माणुसकीची शिकवण जपतानाच राज्यातील इतर संस्थांसमोर आदर्श निर्माण केला आहे, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साई संस्थानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

शिर्डी : कोविडच्या संकटात ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प व आरटीपीसीआर लॅबची निर्मिती करून साई संस्थानने माणुसकीची शिकवण जपतानाच राज्यातील इतर संस्थांसमोर आदर्श निर्माण केला आहे, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साई संस्थानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

साईभक्तांच्या देणगीतून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, तर आरटीपीसीआर लॅबचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाइन लोकार्पण केले.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, देणगीदार के. व्ही. रमणी, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची ऑनलाइन, तर खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे, संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे, डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, बाबासाहेब घोरपडे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, कमलाकर कोते, अभियंता रघुनाथ आहेर, डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. मैथिली पितांबरे आदी सभागृहात उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, मंदिर बंद असले तरी वैद्यकीय, स्वच्छता कर्मचारी, पोलीस अखंड सेवा देत आहेत. संकटकाळात देणगीदारांच्या मदतीने ऑक्सिजन निर्मितीसारखे प्रकल्प उभे राहात आहेत. जीव वाचवणारे हे कार्य भाविकांसाठी श्रद्धेची फलश्रुती असून, देव सोबत असल्याचाच अनुभव आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून सज्जता केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांना चालना देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे.

अजित पवार म्हणाले, साई संस्थानकडून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली जाते. ऑक्सिजन तुटवडा असल्याने उद्योगांसाठी लागणारी ऑक्सिजन निर्मिती कमी करून मेडिकल ऑक्सिजन निर्मितीला प्राधान्य दिले आहे. संस्थानचे सीईओ बगाटे यांनी प्रास्ताविका केले. डेप्युटी सीईओ ठाकरे यांनी आभार मानले.

ऑक्सिजन प्लांटसाठी रिलायन्स फाउण्डेशनने एक कोटी ८९ लाखांचे सयंत्र, साईभक्त रमणी यांनी शेड व सिव्हिल वर्कसाठी साडे ४४ लक्ष तर पाइपलाइनसाठी प्रथम फाउण्डेशनने दहा लाखांची देणगी दिली, या प्लांटमधून तीनशे बेडसाठी चोवीस तास ऑक्सिजन उपलब्ध होईल. आरटीपीसीआर लॅबमध्ये प्रतिदिनी दीड हजार तपासण्या होऊ शकतील.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरUddhav Thackerayउद्धव ठाकरेshirdiशिर्डी