साईसंस्थानच्या कर्मचाऱ्याची निळवंडेच्या जंगलात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:15 IST2021-07-10T04:15:47+5:302021-07-10T04:15:47+5:30

शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पाचजणांविरुद्ध ...

Sai Sansthan employee commits suicide in Nilwande forest | साईसंस्थानच्या कर्मचाऱ्याची निळवंडेच्या जंगलात आत्महत्या

साईसंस्थानच्या कर्मचाऱ्याची निळवंडेच्या जंगलात आत्महत्या

शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पाचजणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. वेणुनाथ सूर्यभान गोंदकर (रा. शिर्डी ), अनिता दिलीप सांभारे (रा. शिर्डी), नानासाहेब श्रावण जाधव (रा. शहा), मंदा बाळाजी जाधव (रा. शहा) व भीमा बाळाजी जाधव (रा. शिर्डी ) या पाचजणांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

निळवंडे ते कौठेकमळेश्वर रस्त्यालगतच्या निळवंडे शिवारातील खिंड जंगलात दिलीप बाबासाहेब सांभारे यांचा मृतदेह बाभळीच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलीसपाटील अशोक कोल्हे यांनी घटनास्थळी जाऊन खात्री करत संगमनेर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलीस विष्णू आहेर यांनी मृतदेह झाडावरून खाली घेत पंचनामा केला. सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे, कौठेकमळेश्वरचे उपसरपंच नवनाथ जोंधळे, पोलीसपाटील अशोक कोल्हे यांनी त्यांना साहाय्य केले. त्याशिवाय घटनास्थळाजवळ एक दुचाकी आढळून आली.

दिलीप सांभारे हे साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात आचारी म्हणून काम करीत होते. त्यांच्या मृतदेहाजवळ आत्महत्येपूर्वी वहीत लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळून आली. आपणावर ही वेळ आणण्यास जबाबदार पाच जणांची नावे मयत सांभारे यांनी चिठ्ठीत लिहून ठेवली असून, १५ लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार त्यात नमूद आहे.

पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड, हे. कॉ. विष्णू आहे, पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर अधिक तपास करीत आहेत.

फोटो : Dilip Sambare

Web Title: Sai Sansthan employee commits suicide in Nilwande forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.