विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील रहिवासी शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याचे संचालक सचिन कदम यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील विविध कोविड सेंटरला आर्थिक मदत केली. त्यांचा मुलगा श्रेयस यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. अवास्तव खर्चाला फाटा देऊन त्यांनी पिंपळगाव पिसा येथील अजितदादा पवार कोविड सेंटर, लोणी व्यंकनाथ येथील व्यंकनाथ महाराज कोविड सेंटर व श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कोविड सेंटरला त्यांनी प्रत्येकी ११ हजार १११ रुपयांची आर्थिक मदत केली. यावेळी नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, बाळासाहेब नाहाटा, एकनाथ खांदवे, सुभाष शिंदे, योगेश भोईटे, अशोक रोडे, सचिन कदम, सुनील माने आदी उपस्थित होते.
030621\img_20210603_080125.jpg
नागवडे साखर कारखान्याचे संचालक व पिंपळगाव पिसा येथील सचिन कदम यांचा मुलगा श्रेयस याचे वाढदिवसाच्या निमित्ताने कोवीड सेंटरला आर्थिक मदत देताना.