रुपेवाडी-चांदा रस्ता खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST2021-06-03T04:16:06+5:302021-06-03T04:16:06+5:30
तीसगाव : पाथर्डी तालुक्यातील रुपेवाडी गावातील रस्ता प्रशासनाला कोणतीही सूचना न देता काही व्यक्तींनी दोन महिन्यांपासून बंद ...

रुपेवाडी-चांदा रस्ता खुला
तीसगाव : पाथर्डी तालुक्यातील रुपेवाडी गावातील रस्ता प्रशासनाला कोणतीही सूचना न देता काही व्यक्तींनी दोन महिन्यांपासून बंद केला होता. या रस्त्याने चांदा, लोहरवाडीसह परिसरातील शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जाण्यासाठी या रस्त्याने जाता येत नसल्याने चार किलोमीटर अंतरावरून दुसऱ्या रस्त्याने हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर वरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचाली झाल्या. ३० मे रोजी हा रस्ता खुला करण्यात आला. याप्रसंगी शंकरवाडी-रुपेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक दहातोंडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दादासाहेब शेळके, ग्रामसेवक भाऊसाहेब हरिश्चंद्रे, ग्रामपंचायत सदस्य उद्धव गोडसे, माजी सरपंच सर्जेराव सोलाट, ग्रामपंचायत कर्मचारी ॲड. बाळासाहेब पुंड, गोडसे, अशोक शेळके, बाबासाहेब शेळके, विठ्ठल चांगूलपाई, संजय मोहिते, शिवाजी गोडसे, पोपट शेकडे, आदिनाथ शेळके, दिलीप शेळके, राम आठरे, अभय शेकडे, शिवाजी शेळके, नवनाथ आठरे, संपत मिठे उपस्थित होते.