भेंडा : पतसंस्था चालवणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. ठेवीदार व कर्जदार दोघांचा मेळ घालून काम करावे लागते, असे उद्गार श्री क्षेत्र देवगड संस्थांनचे महंत भास्करगिरी महाराज यांनी काढले.
श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटी व श्री संत नागेबाबा ग्रामीण पतसंस्थेचे नवीन सुसज्ज वास्तूत स्थलांतर व नागेबाबा मार्टचे लोकार्पण महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी भेंडा (ता.नेवासा) येथे झाले. यावेळी ते बोलत होते.
माजी आमदार पांडुरंग अभंग ध्यक्षस्थानी होते. नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, उदयन गडाख, तुकाराम मिसाळ, अंकुश महाराज कादे व्यासपीठावर उपस्थित होते.
पांडुरंग अभंग, काशिनाथ नवले, विठ्ठलराव लंघे, बापूसाहेब नजन यांनी मनोगत व्यक्त केले.
कोरोना कालावधीत गावासाठी अहोरात्र काम करणारे अंबादास गोंडे, सुखदेव फुलारी, डॉ. अविनाश काळे, राजेंद्र चिंधे, आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त संगीता गव्हाणे, माणिक शिंदे, बापूसाहेब नवले यांचा भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी अशोक मिसाळ, दत्तात्रय काळे, गणेश गव्हाणे, ज्ञानेश शिंदे, सरव्यवस्थापक अमित फिरोदिया, अजित रसाळ, आबासाहेब काळे, भाऊसाहेब फुलारी, समीर पठाण, गणेश महाराज चौधरी, सुभाष चौधरी, आरोग्य मित्र सुभाष गायकवाड, ॲड. रवींद्र गव्हाणे, साईनाथ गोंडे, शिवाजी पाठक, शिवाजी तागड आदी उपस्थित होते.
संजय मनवेलीकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सविता नवले, गणेश चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. नागेबाबा परिवाराचे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांनी आभार मानले.
फोटो ओळ २९ भेंडा
नागेबाबा मार्ट लोकार्पण करताना भास्करगिरी महाराज, पांडुरंग अभंग, कडूभाऊ काळे व इतर.