सेंट्रल बँकेचे ७० लाख रुपये खातेधारकांच्या खात्यावर होणार जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:25 IST2021-08-13T04:25:30+5:302021-08-13T04:25:30+5:30
निघोज : आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून राज्य राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष जितेश ...

सेंट्रल बँकेचे ७० लाख रुपये खातेधारकांच्या खात्यावर होणार जमा
निघोज : आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून राज्य राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष जितेश सरडे यांनी आंदोलनासह पाठपुरावा केल्याने वडझिरे (ता. पारनेर) सेंट्रल बँक ऑफ इंडिया घोटाळा प्रकरणातील जवळपास ७० लाख रुपये खातेधारकांच्या खात्यावर येणाऱ्या ३० सप्टेंबरपर्यंत जमा होणार आहेत. तसे लेखी आश्वासन सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अहमदनगरच्या क्षेत्रीय प्रबंधक रुद्र दत्त यांनी दिले.
गेल्या दोन वर्षांपासून खातेदारांच्या खात्यावरून परस्पर पैसे लाटण्याचा प्रकार या बँकेत घडला होता. त्यामुळे अनेक ठेवीदारांचे पैसे या घोटाळ्यामुळे अडकून पडले होते. मात्र, तीन महिन्यांपासून या गोष्टींचा पाठपुरावा करत असताना शेवटी बँक प्रशासनाने ३० सप्टेंबर रोजी ७० लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाचा इशारा मागे घेण्यात आला.
पारनेर तालुक्यातील सेंट्रल बँकेच्या अनेक शाखांमध्ये अपुरी कर्मचारी व्यवस्था, एटीएममध्ये पैसे नसणे, पासबुक प्रिंट वेळेवर करून न भेटणे, ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे देणे, आदी प्रकार घडत आहेत. तशा तक्ररी आहेत. यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करण्याचा आदेश क्षेत्रीय प्रबंधक यांनी सर्व शाखांमधील व्यवस्थापकांना दिला आहे.
आमदार नीलेश लंके यांनीही वेळोवेळी या प्रकरणाबद्दल बँक अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. त्यामुळे बँक प्रशासनाला वरील प्रकरण तातडीने हाताळणे गरजेचे झाले होते.
----
गेल्या एक वर्षापासून आम्ही आमचे खात्यात ठेवलेले पैसे भेटावे त्यासाठी प्रयत्न करत होतो. मात्र, त्यात आम्हाला नेहमी उडवाउडवीची उत्तरे देऊन बोळवण केली जात होती. मात्र, आमच्या सर्वांसाठी जितेश सरडे यांनी घेतलेल्या आक्रमक भुमिकेमुळे लेखी आश्वासन मिळाले.
-सुखदेव चौधरी,
बँक खातेधारक
-----
१२ निघोज १
सेंट्रल बँकेचे उपक्षेत्रीय प्रबंधक एस. चंदन यांच्याकडून लेखी आश्वासन स्वीकारताना जितेश सरडे, चंद्रभान ठुबे, गणेश कळमकर.