घरातून चोरले ६० हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST2020-12-13T04:35:23+5:302020-12-13T04:35:23+5:30
बुलेट चोरली अहमदनगर: पारनेर तालुक्यातील भोंद्रे येथून चोरट्यांनी ७० हजार रुपयांची बुलेट चोरून नेली. २५ ते २६ नोव्हेंबर रोजी ...

घरातून चोरले ६० हजार रुपये
बुलेट चोरली
अहमदनगर: पारनेर तालुक्यातील भोंद्रे येथून चोरट्यांनी ७० हजार रुपयांची बुलेट चोरून नेली. २५ ते २६ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी राजेंद्र बाळासाहेब झावरे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात ११ डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार कडूस हे पुढील तपास करत आहेत.
वनपाल क्वॉटरमधून बॅटरी चोरल्या
अहमदनगर: कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील वनपाल क्वॉटर येथून चोरट्यांनी १४ हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या व दोन सोलर प्लेट चोरून नेल्या. १४ ते २० नोव्हेंबर रोजी ही चोरी झाली. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात वनरक्षक राकेश सुभाष कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड कॉस्टेबल माळशिखरे हे पुढील तपास करत आहेत.
२० हजार रुपयांच्या शेळ्या चोरल्या
अहमदनगर: नगर तालुक्यातील नेप्ती फाटा येथील घरासमोरून चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीच्या दोन शेळ्याा चोरून नेल्या. १० डिसेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात बाबासाहेब भाऊ कानडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड कॉस्टेबल फोलाणे हे पुढील तपास करत आहेत.